ताज्या घडामोडी

महागांव तालुक्यातील घरकुल लाभार्थी निधीच्या प्रतीक्षेत!

 

यवतमाळ : एस के. चांद यांची रिपोट

 

महागांव पंतप्रधान घरकुल आवास योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे.मात्र ऐन वेळेवरच घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे अनेक गोरगरीब घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी कर्जबाजारी काढुन घरकुलाच्या जोत्याचे बांधकाम पूर्ण केले आहेत.जिओ टाॅकीग होवूनही जवळपास एक ते दीड महिन्याचा कालावधी उलटुनही अघापही दुसरा व तिसरा हप्ता शासनाकडून प्राप्त न झाल्याने अनेकांचे बांधकाम रखडले आहेत.केवळ पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा तालुक्यातील लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे मात्र उर्वरित दुसरा व तिसरा हप्ता मिळत नसल्याने अनेक लाभार्थ्यी निधीच्या प्रतीक्षेत आहेत या घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे पक्या घराचे स्वप्न आता पूर्ण होणार किंवा नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे तालुक्यातील मंत्री खासदार, आमदार यांनी तात्काळ घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

About The Author