ताज्या घडामोडी

बिटरगाव पोलीस स्टेशन,नगरपंचायत,महावितरण विभागा कडून संयुक्त मिरवणूक मार्गाची पाहणी.

ढाणकी प्रतिनिधी. मिलिंद चिकाटे

बिटरगाव पोलीस स्टेशन,नगरपंचायत,महावितरण विभागा कडून संयुक्त मिरवणूक मार्गाची पाहणी.

ढाणकी शहरात आगामी होणाऱ्या पोळा, गणपती या सण उत्सवाच्या निमित्ताने मिरवणूक मार्गात जाणवणारी, होणारी समस्या निकाली काढण्या करीता तिन्ही विभागा कडून पाहणी करण्यात आली. यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी मिरवणूक मार्गातील अडथळे,रोड साईड ला चालू असलेल्या बांधकाम मुळे वीट,गिट्टी,रेती रोड वर असल्या कारणाने मिरवणुकीत अडथळा निर्माण होणार त्यामुळे बांधकाम करणाऱ्या घरमालकाला रोड वरील बांधकामचे साहित्य त्वरित उचलण्याचे सांगण्यात आले.मिरवणूक मार्गांवर खडे बुजवावे, मिरवणूक दरम्यान अडथळा निर्माण होणाऱ्या झाडाच्या फ़ांद्या कट कराव्या.मिरवणूक मार्गातील सर्व विधुत खांब्यावर लाईट बसवावे असे नगरपंचायत विभागाला सूचना देण्यात आल्या. मिरवणूक मार्गात अडथळे निर्माण करणारे विधुत तारे त्वरित काढून घ्यावे किंवा मिरवणूक मार्गला अडथळा निर्माण होणार नाही असे उंच करावे असे महावितरण कर्मचारी यांना सांगितले.मिरवणूक मार्गाची पाहणी करते वेळी. पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, बिट जमादार मोहन चाटे, जमादार रवी गिते, पोलीस शीपाई हिंमत जाधव, खोपीया पोलीस प्रकाश मुंडे नगरपंचायत नगरविकास अभियंता अशोक देशमुख, लिपिक राजू दवणे, महावितरण उपाभियंता जाधव, सहायक अभियंता आत्राम कर्मचारी यांनी पाहणी करून मिरवणूक विना अडथळा झाली पाहिजे म्हणून सर्वंनी मिळून पाहणी केली.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *