नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर
शासकीय सर्व विभाग निहाय आस्थापनांमध्ये अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व सामान्य नागरिकांना राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी म्हणून शासकीय आस्थापनांमध्ये सर्व विभाग निहाय वर्ग एक ते चतुर्थ श्रेणी पर्यंतच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेमध्ये कर्तव्य बजावत असताना गळ्यात ओळखपत्र (आय कार्ड ) कार्यालयीन गणवेश व आपल्या प्रतिष्ठान च्या ठिकाणी आपल्याकडे शासनाने सोपविलेल्या कामांची यादी ( जॉब कार्ड ) नाम पदनामा सह दर्शनी भागात माहिती फलक लावणे बंधनकारक असताना देखील अंमलबजावणी होत नसल्याने जिल्ह्यातील सर्व आस्थापनांमध्ये शासन आदेशा नुसार वरील बाबींचा शासकीय कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांच्या कल्याणकारी योजनेसह इतर कार्यालयीन कामासाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे सामान्य नागरिकांची कार्यालयांमध्ये होत असलेली हेळसांड थांबवण्यासाठी म्हणून मेहरबान साहेबांनी शासकीय सर्व विभाग निहाय कार्यालयांमध्ये बेसिस्त अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्यासाठी आदेशित करावे असे मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे .




