ढाणकीभाग्य विधाताचे नांव अस्पष्ट, उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रताप प!
ढाणकी प्रतिनिधी:-मिलिंद चिकाटे
बऱ्याच वर्षारवाली उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने ढाणकी येथे येथील बाजार पेठ पाहुन या ठिकाणी दुय्यम कृषी उत्पन्न समितीची शाखा उघडुन या बाजार समितीला स्व.गुलाबसिंह ठाकुर असे नामकरण केले मागील काही महिन्यांपूर्वी रंगरंगोटी सुध्दा केली परंतु वरिल गेटच्या कमानीवर नाव असुन त्याचा विसर पडला स्व.गुलाबसिंह ठाकुर हे स्व.भाऊसाहेब माने ,जेठलजी माहेश्वरी हे आमदार द्वय यांच्या सोबत चे सहकारी होते स्व.गुलाबसिंहजी ठाकुर यांच्या कार्यकाळात ढाणकीचा विकास झाल्याने जनतेने त्यांना ढाणकी भाग्याविधाते असे संबोधले म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांच्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यावेळचे सभापती देवरावजी काळे यांनी वरील नामाकरण केले असे सांगण्यात येते ढाणकीच्या गेटच्या कमानीवर नाव एवढे अस्पष्ट झाले आहे की येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांस ,नागरीकास कमालाची अस्वस्थता वाटत आहे तरी कृषी उत्पन्न बाजार समितीने आता तरी वरील नाव अस्पष्ट अक्षरात लिहावे व ढाणकीच्या कार्यालयीन कामकास त्यांच्याच नावाने व्हावा अशी जनतेची इच्छा आहे



