ताज्या घडामोडी

उंचवडद येथे अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त लहुजी क्रांती मोर्चा फलकाचे अनावरण    

उंचवडद येथे अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त लहुजी क्रांती मोर्चा फलकाचे अनावरण

 

ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे

 

उमरखेड तालुक्यातील उंचवडद या गावी अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम व लहुजी क्रांती मोर्चा या संघटने च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीस अण्णा भाऊ साठे, लहूजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वज फडकविण्यात आला. महापुरुषांचे विचार अंगी बाणून, संघटीत होऊन संघर्ष केल्यास आपल्याला व आपल्या समाजाला न्याय व हक्क मिळवून देता येतील असे प्रतिपादन वक्त्यांनी केले. तसेच नव्याने गठीत झालेल्या लहूजी क्रांती मोर्चा शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्वान केवटे, प्रमूख उपस्थिती विनोद बनसोडे लहूजी क्रांती मोर्चा चे महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमूख, पुंडलिक तलवारे विदर्भ प्रभारी व संजय बनसोडे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, गावचे सरपंच व गावातील सर्व समाजबांधव उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती कांबळे व आभार प्रदर्शन दिलीप कलाले यांनी केले. लहुजी क्रांती मोर्चा द्वारे कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *