ताज्या घडामोडी

फुलसावंगी मार्गे ढाणकी ते पुसद बस सुरु.[माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाच्या लढ्याला यश.]

फुलसावंगी मार्गे ढाणकी ते पुसद बस सुरु.[माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाच्या लढ्याला यश.]

ढाणकी । प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे.

येथील माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ संघटना ही या विभागातील नागरिकांचं दळणवळण सुस्थितीत व्हावं याकरिता नेहमी लढा देताना दिसते.मागील वर्षी ढाणकी ते पुसद बस सेवा सुरू असताना अचानक पणे बंद करण्यात आली होती. ती सेवा माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाच्या माध्यमातून आज पूर्ववत करण्यात आली. या बसमुळे सदर रूटवरील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना दळणवळणासाठी मोठा फायदा होणार आहे.

आज सकाळी ढाणकी येथील नवीन बस स्टॅन्ड येथे, बसचे चालक सुभाष देवबा काळे व वाहक सौ. प्रेरणा साठे यांचा शाल देऊन सत्कार ढाणकी शिवसेना शहरप्रमुख संजय सलेवाड यांच्या हस्ते करण्यात आला. तद्नंतर श्रीफळ फोडून बस प्रवासाकरिता निघाली.

याप्रसंगी माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाचे अध्यक्ष शेख इरफान शेख गुलाब, सचिव हिरासिंह चव्हाण, पत्रकार सुनील मांजरे, अशोक गायकवाड, मिलिंद चिकाटे, रमेश घुगरे, गवई सर, प्रदीप गायकवाड व काही प्रवासी उपस्थित होते.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *