ताज्या घडामोडी

दहा लाखचा दलित वस्ती निधी लाटण्यासाठी कंत्राटदाराचा थातूर मातुर रोड करण्याचा प्रयत्न.

दहा लाखचा दलित वस्ती निधी लाटण्यासाठी कंत्राटदाराचा थातूर मातुर रोड करण्याचा प्रयत्न.

 

ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे

 

उमरखेड तालुक्यातील सोईट ग्रामपंचायत हद्दीत दलित वस्ती सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असून. दहा लाखचा दलित वस्ती निधी लाटण्यासाठी कंत्राटदाराचा थातूर मातुर रोड करण्याचा प्रयत्न करत असल्याचे येथील नागरिकांची ओरड आहे. हे बांधकाम जिल्हा परिषद उमरखेड यांच्या नेतृत्वात असून दलित वस्ती सिमेंट रस्त्याचे बांधकाम कंत्राटदार अंदाजपत्रकाला डावलून रस्ता थातूर मातुर करत असून सुद्धा त्यावर कारवाई करत नसल्याने नागरिक रोष व्यक्त करत आहे. या रस्त्यासाठी पाया करताना जुना रोड न खनता व ज्या ठिकाणी चिखल ने भरलेला खड्डा असताना त्यातच माती टाकून काँकरीट मिश्रण टाकून रोड बनवत आहे.हा रस्ता पहिलेच काळ्या मातीच्या जमिनीवर असून बांधकामात तडा जाऊन रस्ता लवकरच खराब होण्याचे नागरिक जाणकारांचे म्हणणे आहे. कंत्राटदार दलित वस्ती 10 लक्ष निधीतून रोड मध्ये पैसा वाचविण्यासाठी रस्ता अतिशय बोगस करत असून या कामाची चौकशी करून रोड चांगल्या दर्जाचे करण्याचे नागरिक मागणी करत आहे. पहिला रस्ता खराब झाल्यास रस्ता उखडून काढायला लावू आणि कंत्राटदाराला रस्ता चांगल्या दर्जाचे करायला लावू.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *