ताज्या घडामोडी

उमरखेड नगरपरिषदेवर नागरिकांचा धडक मोर्चा.

उमरखेड नगरपरिषदेवर नागरिकांचा धडक मोर्चा.

उमरखेड प्रतिनिधी.

उमरखेड : येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेत मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लोकविकास समन्वय संघर्ष समिती च्या वतीने येथील नाग चौकातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या वसाहतीमध्ये चांगले रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या,शिक्षण,आरोग्य,पथदिवे, मुलांना खेळण्यासाठी मैदानही नाही. या परिसरातील घरांना नगरपरिषदेच्या वतीने क्रमांकही देण्यात आले नाही.तसेच मुलभुत सुविधांचा प्रचंड अभाव आहे.या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मागण्यांसाठी गंगाधर गायकवाड यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा काढण्यात आला.

 

यावेळी उपोषणाचा देखील इशारा देण्यात आला होता. परंतु नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. *मोर्चाला विजय गाभने, बहुजन मुक्ती पार्टी चे उमरखेड महागाव विधानसभेचे उमेदवार विद्वान केवटे यांनी पाठिंबा देत झोपलेल्या आमचे जन प्रतिनिधी आणि प्रशासन झोपेत आहे की काय हा खडा सवाल यावेळी व्यक्त केला.*

यावेळी उज्ज्वला पडलवार यांनी संबोधित केले.

 

यावेळी गंगाधर गायकवाड, नारायण साबळे, ज्योती जोगदंड, रत्नमाला गायकवाड, पंडित जोगदंड, संतोष पवार, उज्ज्वला जोगदंड, स्वी काळे, शारदा साबळे, नंदा कांबळे आदींची भाषणे झाली. मोर्चात करवंदा गायकवाड, लता गायकवाड, श्याम सरोदे, जयराज गायकवाड, बबन वाहुळकर, चांदू लोखंडे, साहेबराव गजभारे आदींचा सहभाग

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *