माहूर तालुक्यातील वायफनी येथील कृष्णा बंडेवार याची महाराष्ट्र पोलीस पुणे येथे निवड.
माहूर ग्रामीण प्रतिनिधी : संतोष निळकांटवार
माहूर किनवट माहूर तालुक्यातील अति दुर्गम आणि डोंगराळ भागातून शेतकऱ्याच्या मुलाने स्वतःच्या मेहनतीवर आणि हलकीच्या परिस्थितीवर मात करून वायफनी या गावचे नाव रोशन केले आहे ही बातमी कळताच वायफनी येथील आशीर्वाद प्रतिष्ठानचे संचालक पिंटू पाटील यांनी त्याची धावती भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व 13 मे 2025 ला वार मंगळवार ला तालुक्यातील उच्च पदावर असणाऱ्या अधिकारी वर्गाकडून त्याचा भव्य मोठा सत्कार करण्याचे नियोजन केलेले आहे विशेष म्हणजे त्यांनी घरी अभ्यास करून कोणताही क्लास न लावता अभ्यास केला व सराव केला सगळं श्रेय त्याच्या वडिलांचे त्यांनी वडिलांच्या काबड कष्टांना शेवटी त्यांनी फळ दिले या कौतुकाबद्दल सर्व नातेवाईक परिसरात मध्ये आनंदाचा त्याच्यावर वर्षाव होत आहे.उपस्थितीमध्ये पिंटू पाटील भास्कर पाटील देवकुमार सूर्यवंशी आनंता मुंडे बालाजी गायकवाड अनिकेत सूर्यवंशी तुळशीराम टिलेवाड सचिन जाधव शिवम बंडेवार दुर्गे्श गायकवाड दयानंद लोखंडे आदी सत्काराचे नियोजन करणार आहेत.




