क्रीडांगण

गरिबीला मात देत अफरोज बनला SRPF पोलीस.विटभट्टिवर मोल मजुरी करत देश सेवेचे स्वप्न केले पुर्ण.

गरिबीला मात देत अफरोज बनला SRPF पोलीस.विटभट्टिवर मोल मजुरी करत देश सेवेचे स्वप्न केले पुर्ण.

 

प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे

 

ढाणकी येथील टेभेश्र्वरनगर नगर झोपडपट्टीमध्ये रहाणारा अफरोज खा निसार खा पठाणने हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करत देश सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.

 

वीटभट्टी वर मोल मजुरी करून त्याने आपले स्वप्न पूर्ण करत यशाला गवसणी घातली आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्नं पुर्ण करता येतात याचे उदाहरण त्याने तरुणांसमोर ठेवले आहे. त्याचा हा संघर्षमय प्रवास अनेक तरुणांना प्रेरणा देणारा ठरणारा आहे.

 

अफरोज खा पठाण याचे आई वडील दोघेही विटभट्टी वर मोलमजुरी करून आपला संसार चालवतात, आपल्या आई वडीला सोबत विटभट्टी वर काम करून अभ्यास करत जिद्दीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर त्याने आपले देश सेवेचे स्वप्न पूर्ण केले. तो आपल्या गावी आला असता अफरोज चे काका अशद खा याने त्याचे जंगी स्वागत केले. बिटरगाव ठाणेदार पांडुरंग शिंदे व शिवसेना ढाणकी शहर अध्यक्ष संजय सल्लेवाड यांनी त्याचा व आई वडीला यांचा सत्कार करून त्यानां शुभेच्छा दिल्या.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *