ताज्या घडामोडी

प्रभाकर दिघेवार प्रधान यंत्रचालक महावितरण यांचा सेवापूर्ती सोहळा थाटात संपन्न.

प्रभाकर दिघेवार प्रधान यंत्रचालक महावितरण यांचा सेवापूर्ती सोहळा थाटात संपन्न.

 

 

ढाणकी -प्रतिनिधी मिलिंद चिकाटे.

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग ढाणकी येथील ३३ के.व्ही.उपकेंद्रात कार्यरत प्रधान यंत्रचालक प्रभाकर शंकर दिघेवार हे नियत वयोमानानुसार ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम ढाणकी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपकार्यकारी अभियंता पवन गिरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब चंद्रे पाटील माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड, प्रकाशअप्पा दुधेवार माजी शिक्षण सभापती नगरपरिषद उमरखेड, संजय पडोळे राज्याध्यक्ष विद्युतक्षेत्र कंत्राटी कामगार युनियन, अनिल वानखेडे सेवानिवृत्त अभियंता हे उपस्थित होते.प्रभाकर दिघेवार हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात दिनांक ९ नोव्हेंबर १९९३ रोजी सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे रुजू झाले होते. नंतर गुंज, ढाणकी,उमरखेड ,लोणबेहळ,पांढरकवडा व पुनश्च ढाणकी येथे सेवा करताना त्यांनी महावितरण कंपनीच्या सेवे सोबतच व्यंगचित्रकारिता व पर्यावरण छंद जोपासला आपल्या ३२ वर्षाच्या सेवेत त्यांनी महावितरण कंपनीच्या भल्यासाठी कार्य केले. आपल्या सेवेशी प्रामाणिक राहून आपल्या कलेच्या माध्यमातून महावितरण कंपनीच्या प्रत्येक योजना ,विद्युत सुरक्षा वीज ग्राहकापर्यंत पोहोचण्याची कार्य केले. अशा हुरहून्नरी कलावंत, पर्यावरण प्रेमी प्रधान यंत्र चालकाचा कंपनीच्या वतीने मुख्य अभियंता अमरावती यांचे प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ ,साडी चोळी देऊन सह पत्नीक सन्मान करण्यात आला.जवळपास १३ ते १४ वर्षाचा कार्यकाळ ढाणकी येथे सेवा करताना त्यांनी समाजमनावर आपुलकी व प्रेमाचे संबंध निर्माण केले हे या कार्यक्रमात उपस्थित राहून ढाणकीवासियांनी दाखवून दिले. महावितरण कंपनीची अचूकपणे सेवा करताना त्यांनी जोपासलेल्या व्यंगचित्रकार कलेमुळे ते राज्याच्या कानाकोपऱ्यात परिचित आहेत. महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळविणाऱ्या प्रभाकर दिघेवार यांनी आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळविले आहेत.याप्रसंगी बोलताना सर्व अतिथींनी त्यांच्या निस्वार्थ सेवेचा व कार्याचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना प्रभाकर दिघेवार यांनी महावितरण कंपनी प्रति आदर व्यक्त करून अनेक ठिकाणी सेवा करताना त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व अभियंते, अधिकारी, जनमित्र यंत्रचालक, वीज ग्राहक यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले.कार्यक्रमाला पोलीस पाटील रमण रावते, मोक्षधाम सेवा समितीचे अध्यक्ष सुभाषबाबू कुचेरिया, शेतीनिष्ठ शेतकरी नितीन येरावार, अमोल तुपेकर,ढाणकी नगरीतील अनेक गणमान्य व्यक्ती, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते,पत्रकार बांधव, मोहन टाले अकोला, गणेश इंगळे, बुलढाणा, अरुण यावले अमरावती, रमेशअप्पा दुधेवार, श्रीकृष्णदयार्णव मुनि, माधवअप्पा काचर्डे,प्रमोद वाळूककर, अनेक आप्त स्वकीय, मित्रवर्ग, महावितरण उपविभाग ढाणकीतील सर्व कर्मचारी,पुसद,यवतमाळ,उमरखेड येथील सहकारी कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अनेक संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुकळकर प्रधानतंञज्ञ, यांनी केले तर आभार दिलीप बिचेवार यंत्रचालक यांनी मानले. स्नेहभोजन कार्यक्रमानंतर पावसाच्या जोरदार सरींनी या सोहळ्याची सांगता झाली.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *