ताज्या घडामोडी

ढाणकी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनी भव्य अभिवादन रॅली संपन्न .

ढाणकी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनी भव्य अभिवादन रॅली संपन्न .

 

प्रतिनिधी :- मिलिंद चिकाटे.

 

69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ढानकी शहरात दी.14/10/2025 रोजी भव्य अभिवादन रॅली चे आयोजन करण्यात आले होते. माता सावित्रीबाई फुले बुद्ध विहार आठवडी बाजार येथून ह्या भव्य रॅलीस सुरुवात झाली.

ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ही मिरवणूक वाटचाल करीत प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन व सामूहिक वंदन घेऊन पुढे गेली.

यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या प्रतिमेस बाळू पाटील चंद्रे यांनी तर संविधान चौक येथे खाजा भाई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण केला.

 

ह्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका सहभागी झाले होते.यावेळी महामानवांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून निघाला.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील नवयुवक मंडळाने व प्रतिष्ठित समाज बांधव नागरिक यांनी परिश्रम घेतले.सर्वत्र ह्या शांततेत पार पडलेल्या रॅलीचे कौतुक होत आहे.

About The Author