महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ यांचा राज्यव्यापी संप….!
श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांचे दिनांक १८ जुलै २०२५ पासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या बेमुदत राज्यव्यापी संप आंदोलनास जाहीर पाठिंबा म्हणून ग्रामीण रुग्णालय माहूर येथे सुद्धा महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ, नांदेड यांचा राज्यव्यापी संप यास पाठिंबा देण्यात आला.
राज्यातील परिचारिकांच्या जिव्हाळ्यांच्या रास्त मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या माध्यमातून दिनांक १८ जुलै २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील परिचारिकांचा बेमुदत काम बंद संप आंदोलन सुरू आहे. सदर संप आंदोलनास राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र चा जाहीर पाठिंबा आहे. परिचारिकांच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक तोडगा काढून त्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा तोडगा न निघाल्यास या महासंघाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी हे सुद्धा बेमुदत संपामध्ये सक्रिय भाग घेतील. अशी सूचना महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांनी शासनाला दिली आहे.




