राजकारण

दुबार पेरणी साठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्या….! 

दुबार पेरणी साठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्या….!

 

मुख्यमंत्र्यासह कृषिमंत्री कडे मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांची मागणी…!

 

माहूर/नांदेडजिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर

 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा पर्जन्य मापकाकडून हवामान अंदाज चुकीचा दर्शवण्यात आल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दोबारा पेरणीचे संकट निवारण करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना दोबारा पेरणी करिता मोफत बियाणे विना विलंब तात्काळ वाटप करण्यासाठी म्हणून जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतला आहे.

शासन नियुक्त जिल्हा पर्जन्य मापन अधिकाऱ्यांकडून चुकीचा हवामान अंदाज दर्शविल्या गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली केली गेली असून हवामान अंदाजावर विश्वास ठेवून रब्बी हंगामाची पेरणी करण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील बहुतांश तालुका स्तरावरील हवामान मापन यंत्र नादुरुस्त अवस्थेत असताना देखील जिल्हा पर्जन्यमापकाकडून अंदाजीत पावसाचा चुकीचा अंदाज दर्शविण्यात आला त्यामुळे पावसाचा लपंडाव शेतकऱ्यांच्या मुळाशी आला आहे, त्याचे दुष्परिणाम म्हणून उभे पिक वाळून ( कोमेजून ) गेल्यात व काही भागात बियाणे उगवलीच नाहीत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या लक्षात घेता शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहुल दोबारा पेरणीसाठी आपल्या स्तरावरून विशेष तरतूद करून दोबारा पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना निवेदनात नमूद विषयाचा संवेदनशील तिने विचार करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ विना विलंब मोफत बियाणे वाटप करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक व जिल्हाधिकारी सह मुख्यमंत्री, कृषिमंत्री यांना निवेदन देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी करण्यात आली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *