राजकारण

कोर्टा येथील हनुमान मंदिर साठी मा.आ.राजूभाऊ नजरधने यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लक्ष रु. भव्य सभामंडपाचे लोकार्पण

कोर्टा येथील हनुमान मंदिर साठी मा.आ.राजूभाऊ नजरधने यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लक्ष रु. भव्य सभामंडपाचे लोकार्पण

 

 

जिल्हा प्रतिनिधी/ एसके शब्बीर

 

उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील मौजा कोर्टा येथे गेल्या 50 वर्षा पासून हनुमान जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी सामूहिक विवाह सोहळा मेळावा पार पडतो पण गेल्या कोरोना काळातील 2 वर्ष विवाह सोहळा होऊ शकला नसल्याने आज अखंड हरिनाम सप्ताह, हनुमान मंदिर जीर्णोधार , तत्कालीन.आमदार राजेंद्र नजरधने यांचे स्थानिक विकास निधीतुन (15 लक्ष रु)भव्य सभामंडपाचे लोकार्पण मा नेते उत्तमराव इंगळे साहेब. व मा आमदर राजेंद्र नजरधने यांचे हस्ते करण्यात आले यावेळी गावकरी नागरिक कार्यकर्ते व मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावचे विलास बेले. श्री धुळधुळे, खराटे. संतोष पवार. सरपंच उपसरपंच गावचे आजी माजी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते

About The Author