माहूरच्या गुंडवळ येथे बिबटयाच्या हल्यात गोरा ठार पीडित शेतकऱ्यांची वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी.
माहूर तालुका प्रतिनिधी,रामेश्वर किसन जाधव तथा {सरपंच गुंडवळ }
माहूर तालुक्यातील मौजे गुंडवळ येथील अल्पभूधारक महिला शेतकरी,रमाबाई वसंता कांबळे,यांची शेती अंदाजे दीड ते दोन की. मी. अंतरावर जमदाग्नी खोरी लगत असल्याने,तसेच समोर पाण्याचा मोठा तलाव असल्याने, आणी रस्ता नसल्यामुळे, शेतातच जनवरांचा गोठा बांधून जनवरांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे.दिनांक 06/06/2025 रोजी नेहमी प्रमाणे,शेतकरी आपल्या शेतात मशागतीचे कामे करून जनावरांना चारा पाणी करून घरी जेवायला आले.जेवण आटोपून जागलीसाठी परत गेले असता शेतातील गोठ्यावर एक गाईचा गोरा दिसून येत नव्हता, त्यामुळे महिला शेतकरीचा पती ब्याट्रीच्या सहाय्याने सदरील गोऱ्याचा शोध घेत असताना, गोट्यापासू अंदाजे तीनसे ते साडे तीनसे फूट अंतरावर बिबट्या गोऱ्याला फरपटत नेऊन, खाताना आढळून आला.यामध्ये पीडित शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून,झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी पीडित शेतकऱ्यांनी वनविभाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केला आहे.



