ताज्या घडामोडी

वर्ग मित्रांचा स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न.22 वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी केला गुरुजनासह मान्यवरांचा सन्मान.

वर्ग मित्रांचा स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न.22 वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी केला गुरुजनासह मान्यवरांचा सन्मान.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड

 

माहूर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आणि श्री जगदंबा हायस्कूल येथे बावीस वर्षे आधी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेऊन आपापल्या मार्गी लागलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 22 वर्षानंतर माहूर शहरातील प्रसिद्ध सराफा व्यापारी तथा भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने यांच्या बालाजी मंगलम या भव्य दिव्य सांस्कृतिक सभागृहात स्नेहसंमेलन घेऊन आपापल्या दैनंदिन जीवनाबद्दल माहितीची देवाण-घेवाण करूत गुरुजना सह मान्यवरांचा सत्कार करून आशीर्वाद घेत शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद घेतला.स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री जगदंबा हायस्कूलच्या तत्कालीन मुख्याध्यापिका श्रीमती मंगलाताई मुनेश्वर ह्या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून

जगदंबा हायस्कूलचे मुख्याध्यापक विस्वाश जाधव सर आरुन कोरटकर सर आर. वाय.राठोड सर एन.जी.गोडसे सर तिवारी सर भिसे सर जगताप सर पोपुलवार सर दवने सर

मस्के सर कपले सर कामोद सोनकर वसंता खंदारे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.तत्कालीन विद्यार्थी तथा भाजपाचे विद्यमान नगरसेवक सागर महामुने उज्वल भोपी सागर दुधे परेश देशपांडे विनोद सुर्यवंशी शैलेश वाघमारे स्वप्निल पवार सतिश चौधरी विकास कपाटे विशाल उबाळे विकास मरमट विजय शिकारे गौरव पलिकुंडवार बाजीराव ससाने जयकांत मोरे दिपक किंगरे विनायक शेवाळे प्रविण राठोड परेश देशपांडे आनुदिप कोरटकर चेतन धनावत संतोश वाकेकर गजानन लाडे गजानन रावते नुरखान पठाण तोफीक खाजा मोशिन शेख मुजिप फारुकी

शितल मध्येवार धनश्री आमले सोनाली डाखोरे प्रिया चंदेल दिपाली गायकवाड निकिता सुने आनिता लसंते सुजाता कांबळे प्रज्ञा गवळी आनिता कोनडे प्रिती लिखदे दिपाली सावळकर वैशाली राऊत यांनी सर्व समक्ष मनोमगत व्यक्त केले.सर्वांचे विचार,काल झालेला कार्यक्रम हा फक्त एक भेट किंवा मनोरंजन नव्हते यात 21 वर्षा नंतर आपण सर्वांनी शाळेतील तो एक दिवस पुन्हा जगून घेतला.त्यात गुरुजनांचे मार्गदर्शन, शाळेतील खेळ, स्नेह भोजनाचा आनंद आणि आमच्या पासून दूर गेलेले मित्र मैत्रिणी काही शासकीय कर्मचारी काही मोठ्या नामांकित कंपन्यांत कार्यरत असणारे काही राजकीय क्षेत्रात काही व्यापारात आणि व्यापारी उध्यागधांद्यात तसेच काही शेती वेवसायात असणारे सर्वजण एक दिवस आपल्या वेळेतील वेळ काढून या स्नेहसंमेलनाचे कार्यक्रमा साठी उपस्थित राहिले कारण हे सर्व अनुभवाने हे आयुष्यात पुन्हा पुन्हा न येणारे क्षण त्यांनी अंतरात साठऊन घेतले.

अध्यक्षीय समारोप भाषण श्रीमती मंगलाताई मुनेश्वर माँडम यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतीश चौधरी यांनी केले सूत्रसंचालन दिपाली गायकवाड विकास कपाटे यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धनश्री आमले कार्तिक उत्तरवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीरित्या गुरुजनांच्या आशीर्वाद मिळवत आनंदात पार पडला.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *