महागांव / कासोळा येथे मिश्र वणीकरणात निकृष्ट दर्जाचे बांधकाम !
यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी : गोपाल एच राठोड.
सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी काळी (दौ)यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाचं करोडो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता ! आरसीसी सिमेंट कामात वाळू मिश्रित बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे.पुसद वन विभागातील महागाव तालुक्यातील काळी (दौ)वनपरिक्षेत्रात कासोळा येथे ओसाड वनाचे पुनर्वणीकरण कार्यक्रमांतर्गत कासोळा ता महागाव येथे मिश्र वनीकरणात बांधकाम चालू आहे. हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून कामाचा दर्जा अत्यंत दर्जाहीन असल्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा निधी पाण्यात जाण्याची दाट शक्यता आहे.सदर वनीकरण क्षेत्र हे १२ हेक्टर परिसरात विस्तारले आहे. जवळपास ३० वन जमिनीत हे उभारल्या जात आहे. वर्तुळ गोज मधील नियत क्षेत्र कासोळा येथे रोपण क्षेत्रात दहा हजार आठशे झाडांची वृक्षारोपण करण्याची उद्दिष्ट आहे. बांधकामाच्या बाह्य सीमांची
लांबी ३००० असून हे एक अत्यंत सुंदर असे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येऊ शकते.शाळेतील मुलांना सहलीसाठी आणि निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी हे वनपरिक्षेत्र तिनी तालुक्यात प्रसिद्ध होऊ शकते. परंतु काळी (दौ)सहाय्यक वन परिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांच्या अधिपत्याखाली हे काम होत आहे.कामाचे योग्य नियोजन आणि काम दर्जाहीन असल्यामुळे शासनाच्या आणि वनविभागाच्या ध्येयधोरणांनाच मूठमाती देण्याचे काम सदर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याद्वारे होत असल्याने या मध्ये निधीची अफरातफर होण्याची दाट शक्यता आहे.सदर बांधकामाची गुणनियंत्रण विभागाकडून पाहणी केल्यास मोठे गो गौडबंगाल उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी वरिष्ठ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कामाची प्रत्यक्ष पाहणी करून दोषीवर कार्यवाही करावी अशी परिसरातील नागरिकांची प्रतिक्रिया आहे.