ताज्या घडामोडी

महागांव : अध्यक्षपदी नागरगोजे तर उपाध्यक्षपदी महामुने यांची निवड.

महागांव : अध्यक्षपदी नागरगोजे तर उपाध्यक्षपदी महामुने यांची निवड.

 

 

यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी गोपाल एचं राठोड….

 

महागाव : युवा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय

अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षेत येथील विश्रांतीगृहावर दोन जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी संजय नागरगोजे, उपाध्यक्षपदी विश्वनाथ महामुने यांची निवड करण्यात आली. यावेळी संजय पाटे यांनी विचार व्यक्त करताना संघटन कसे असावे याबाबत विस्तृत माहिती दिली. नवनिर्वाचित अध्यक्ष संजय नागरगोजे यांनी संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा आपल्यावर आल्याने सर्व पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी जाणून त्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी विश्वनाथ महामुने यांनी मत व्यक्त केले. संघटना पत्रकारांसोबत खंबीरपणे असल्याची भूमिका संघटनेचे विभागीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केली. यावेळी पत्रकार विजय सूर्यवंशी, संजय पाटे, रजत खाडे, शेर खान पठाण तसेच श्रीकांत राऊत यांची उपस्थिती होती.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *