राजकारण

आयमेक्स परिषदेत ना.इंद्रनील नाईकांचा महाराष्ट्राच्यावतीने सहभाग.

आयमेक्स परिषदेत ना.इंद्रनील नाईकांचा महाराष्ट्राच्यावतीने सहभाग.

 

यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी गोपाल एच राठोड

 

महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरोचे लोकार्पण

यवतमाळ जगभरातील :

दीडशेहून अधिक राष्ट्रांचा सहभाग असलेल्या आयमेक्स’ या ग्लोबल ट्रेड शोमध्ये जर्मनीच्या फ्रैंकफर्ट शहरात संपन्न होत असलेल्या परिषदेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी सहभाग घेतला. या जागतिक चळवळीमध्ये ‘महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरो’च्या माध्यमातून योगदान देणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य असून, त्याचे प्रतिनिधित्व करणे हे जेवढे अभिमानास्पद आहे, तेवढेच मनस्वी समाधान देणारे असल्याचे मत ना. नाईक यांनी व्यक्त केले.पर्यटन, व्यापार, मनुष्यबळ आणि इव्हेंटच्या माध्यमातून जागतिक संवाद वाढवून ‘हे विश्वची माझे घर’ ही व्यापक संकल्पना मांडणाऱ्या आयमेक्स परिषदेत ‘महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरो’चे उद्घाटन व ब्युरोच्या लोगोचे लोकार्पण नामदार नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.

About The Author