ताज्या घडामोडी

चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक.

चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक

​ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना व्यवहारज्ञानाची ओळख व्हावी, या उद्देशाने चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी लावलेले विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि त्यांच्यातील व्यापारी कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली.

​कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामरावजी गायकवाड उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन केले. बिटरगाव सर्कलचे केंद्रप्रमुख विजयजी चौधरी सर यांनीही या उपक्रमाला भेट देऊन शिक्षकांचे अभिनंदन केले.

​शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश महाजन व उपाध्यक्ष सतीश मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर रामटेके, विशाखा हनवते, जयश्री गव्हाळे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक रंगराव महाजन, संजय हनवते, अंकुश हनवते, सुरज सकतकर आणि कृष्णा गव्हाळे यांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शेख शाहरुख शेख आलम यांनीही या मेळाव्याला विशेष उपस्थिती दर्शवली.

​मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक अमोल मोरे सर, सहाय्यक शिक्षक व्यंकट पवार सर आणि अंगणवाडी सेविका सुशीला हनवते यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पालकांनी व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. शालेय जीवनात आनंदाचे क्षण पेरणाऱ्या या मेळाव्याची चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *