ताज्या घडामोडी

पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवादयावर कठोर ते कठोर कार्यवाही करा.

पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवादयावर कठोर ते कठोर कार्यवाही करा.

 

मिलिंद चिकाटे:ढाणकी प्रतिनिधी :

 

जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल ला पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या मृत्युस जबाबदार असलेल्या दहशतवादयावर कडक कार्यवाही करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, ढाणकी शहर पदाधिकारी व सदस्यगण यांनी ठाणेदार साहेब, पोलीस स्टेशन बिटरगांव/आऊट पोस्ट ढाणकी- च्या मार्फत महामहिम द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन दिला ,या निवेदनात त्यांनी पुढील मागणी करत जम्मु काश्मीर येथील पहलगांम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवादी यांनी केलेल्या हल्यात आपल्या देशातील 28 पर्यटकांचा गोळीबार करून ठार करण्यात आले.हे हल्ला आपल्या देशातील गुप्तचर यंत्रनेचे अपयश अपयशामुळे झाला.असून सदर ठिकाणी दहशतवादी हल्ला करून 28 निष्पाप लोकांचा बळी घेवून निघून जातात. तेव्हा आपल्या देशाची गुप्तचर यंत्रना व संरक्षण यंत्रना तसेच जम्मू काश्मीर पोलीस यंत्रना काय करत आहेत समजण्यास मार्ग नाही. सदर घटनेमुळे देशात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तेव्हा महोदय आपण सदर हल्याची अतिशय गांभीर्याने दखल घेवून झालेल्या हल्यात जबाबदार असलेल्या दहशतवादी व त्यांना मदत करणा-या सहका-यांना शोधून त्यांचेवर योग्य ती कडक कार्यवाही करून देशात भयमुक्त वातावरण निर्माण झाले असून ते दूर करून . यापूढे आपल्या देशाकडे वाकड्या नजरने पाहण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही अशी ठोस कार्यवाही करण्यात यावी. सदर झालेला हल्ला हा देशावर झालेला हल्ला आहे. त्यामुळे संरक्षण यंत्रणा व जम्मु काश्मिर राज्याची प्रशासकीय यंत्रणा यांना योग्य ती समज देण्याचे निवेदनात सांगितले आहे.यावेळी बाळासाहेब चंद्रे पाटिल,अमोल तुपेकर, ख्वाजाभाई कुरेशी,जहिर जमीनदार, गजानन मिटकरे,बाबुराव नरवाडे, रूपेश भंडारी, रामराव गायकवाड, रमेश गायकवाड,किशोर ठाकुर शिवाजी वैदय, बंटी वाळके,सुभाष गायकवाड,माधव अलकटवार, ओमापाटिल चंद्रे,संदीप वैध्य, नवाब, शेख अनिर, खंडू लकडे,दत्ता हाके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *