क्राईम डायरी ताज्या घडामोडी

उमरखेड /नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू तर एका बालकाचे प्राण वाचले.

उमरखेड /नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू तर एका बालकाचे प्राण वाचले.

ब्युरो रिपोर्ट/अजीज खान

 

ढाणकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली धुणे धुण्यासाठी गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांना वाचवण्यासाठी जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली मात्र द्या दोन मुलींना त्यांना वाचवण्यात यश आले नाही, त्या दोघांपैकी एक मुलगा पाण्यात बुडाला.

 

सविस्तर वृत्त असे की, सावळेश्वर येथे मामाच्या घरी आलेल्या कावेरी गौतम मुनेश्वर वय (15) ही मुलगी आपली मैत्रीण अवंतिका राहुल पाटील वय (14) तिच्यासोबत धुणे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. धुणे धुतल्या नंतर दोघी आंघोळी करता नदीपात्रात उतरल्या असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्या बुडू लागल्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून बाजूलाच नदीकाठी असलेले चेतन देवानंद काळबांडे राहणार सावळेश्वर वय (16) , व शुभम सिद्धार्थ काळबांडे वय (22) हे दोघे मदतीसाठी धावले. मात्र घाबरलेल्या कावेरी आणि अवंतिकाने वाचवण्यासाठी आलेल्या चेतन याला घट्ट पकडल्याने चेतन सुद्धा पाण्यात बुडू लागला तर शुभम यामधून वाचला. घटनेची माहिती गावामध्ये कळताच गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. यात गावकऱ्यांनी शुभम याला वाचवले मात्र त्या तिघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले नाही. चौघांना नदीतून बाहेर काढल्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे आणले असता डॉक्टरांनी कावेरी, अवंतिका आणि चेतन यास मृत घोषित केले. या घटनेमुळे सावळेश्वर गावामध्ये हळ हळ व्यक्त होत आहे .

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *