7 फूट खोल गड्या पडलेला तो विद्यार्थी थोडक्यात बचावला
ढाणकी प्रतिनिधी. मिलिंद चिकाटे
नगरपंचायत चा गावाला पाणी सोडणारा मुख्यवाल गावात येणाऱ्या मेन रोड वर आहे. याच रस्त्याने विध्यार्थी शाळेत ये जा करतात. या रस्त्या चे काम चालू असून एक्क साईड वाहतूक वळती करण्यात आली. वाल रस्त्याच्या कडेला असल्याने तो वाल नेहमी पाण्याने भरून राहत आहे नागरिकांनी वाल विषयी नगरपंचायतला अनेक वेळा तक्रारी केल्या. परंतु नगरपंचायतने नागरिकांच्या तक्रारीची कोणतीही दाखल घेतली नाही.
नागरिकांना ज्याची भीती होती तीच अखेर आज खरी ठरली. सकाळी शाळेत जाणारा चिमुकला पाणी साचून राहणाऱ्या वाल च्या सात फूट खोल खड्यात पडला. रस्त्याने जाणाऱ्या व व्यापारी यांच्या त्वरित मुलगा खड्यात पडल्याचे दिसताच. साई मोबाईल गॅलरीचे ओनर उदय पुंडे यांनी खड्यात उतरून चिमुकल्या मुलाचे प्राण वाचविले.
थोडा जरी उशीर झाला आसता तर आज नगरपंचायतच्या निष्क्रियते मुळे एक्का निष्पाप चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आसता.
खड्यात पडलेले चिमुकल्याला त्वरित जवळच्या दवाखान्यात नेऊन उपचार केले. ही बाब नगरपंचायत च्या अभियंत्याला सांगितले असता तो विभाग माझ्याकडे नाही व माझ्याकडे बांधकाम विभाग असल्याचे देशमुख यांनी सांगितले
नगरपंचायत आत्ता तरी त्या वाल ला चेंबर बांधकाम करून बंदिस्त करेल का.? असा प्रश्न ढाणकी करत पडला आहे तर याच वॉल मधले सडके पाणी धानकी कराच्या आरोग्याची धोका निर्माण करत असल्याचेही नागरिकात बोलल्या जात आहे कारण हेच पाणी
ढाणकी करांना वितरित झाल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे
त्या ठिकाणी तात्काळ बॅरिकेट लावण्यात येईल व लवकरात लवकर चेंबर बांधकाम करण्यात येईल
श्री रवींद्र राऊत
मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत ढाणकी
नरपंचायत ने रोड च्या काठी असलेला वाल चा गड्डा त्वरित बांधून घ्यावा अन्यथा नगरपंचायत समोर आंदोलन करण्यात येईल.
सै. माजीद.
प्रहार तालुका आध्यक्ष उमरखेड.
नगरपंचायत ला जाग आल्यामुळे पर्यायी व्यवस्था करताना कर्मचारी




