Mahur / डॉक्टर झाल्याच्या खुशीत विशाल बंडू राठोड यांचं ग्रामपंचायत कार्यालय गुंडवळ यांच्यावतीने जंगी स्वागत.

माहूर तालुका प्रतिनिधी : रामेश्वर जाधव यांची बातमी.
माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेले मोजे गुंडवळतांडा येथील विशाल बंडू राठोड यांनी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण गुंडवळ येथील जिल्हा परिषद शाळेत घेतले.
घरची परिस्थिती बेताजी आणि आईवडीलही अशिक्षित,त्यामुळे विशाल नेहमी चिंतेत असायचा. परंतु जिद्द चिकाटी आणि खडतर परिश्रमाच्या बळावर विशालने आकाशाला गवसणी घालून आपल्या आईवडिलांच स्वप्न पूर्ण केला आहे. त्यामुळे आज गुंडवळ ग्रामपंचायत च्या वतीने सत्काराचा कार्यक्रम घेऊन अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचं जंगी स्वागत करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मौजे गुंडाळ येथील विद्यमान सरपंच रामेश्वर जाधव, नायक रामसिंग जाधव, वसंता आडे कारभारी, माजी सरपंच उत्तमराव खंदारे, ग्रामपंचायत सदस्य.. सुमनबाई खंदारे, रमाबाई कांबळे, परसराम राठोड, प्रियंका आडे, यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक गोविंद राठोड, मोहन जाधव, मोहन आडे, कैलास राठोड, यांनी.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
विशेष म्हणजे विशाल राठोड यांचे वडील बंडू राठोड यांनी मुलगा डॉक्टर झाल्याच्या खुशीत गावकऱ्यांना अन्नदान केले. त्यामुळे डॉक्टर विशाल राठोड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.




