पुसद आयकॉन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरवाडी गांव येथे आरोग्य शिबीर संपन्न.
यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाल राठोड.
आज दिनांक 01/04/2025 वार मंगळवार रोजी श्री गजानन फोपसे (पंचायत समिती सदस्य मित्र मंडळ पाथरवाडी ता.पुसद जि.यवतमाळ व.आयकॉन हॉस्पिटल पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने पाथरवाडी गांव येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले .या शिबिर मध्ये खालील तज्ञ डॉक्टरानी डॉ. राहुल राठोड.डॉ.रवि पोलाने. यांनी तपासणी व मार्गदर्शन केले तसेच मोफत मेडिकल वाटप व.शुगर तपासणी अनिल ब्रदर यांनी केले रुग्णाची नाव नोंदणी आशा वर्कर इंदू ताई यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन फोपसे पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य.गावातील प्रतिष्ठित नागरिक.उपस्थित होते. या शिबिराचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद मुख्याध्यापक सरांनी केले या शिबिर मध्ये ६५रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच महात्मा ज्योतिबाराव फुले जन आरोग्य योजनाचा गरजु ५ते ६रुग्ण लाभ घेणार आहेत.गावातील लोकांनी आयकॉन हॉस्पिटल ची आभार व्यक्त केले.



