ताज्या घडामोडी

माहूर /नगरपंचायत ला 50 लाख रुपयाचे बक्षीस माझी वसुंधरा अभियानात माहूरला दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद.

माहूर /नगरपंचायत ला 50 लाख रुपयाचे बक्षीस माझी वसुंधरा अभियानात माहूरला दुसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद.

 

तत्कालीन मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांच्या प्रयत्नांना यश

 

शासनाच्या वेबसाईटवर शासनाकडून डॉ राजकुमार राठोड यांचे फोटो टाकून अभिनंदन

 

माझी वसुंधरा अभियान ४.० विभागीयस्तरावरील विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन!

 

 

श्रीक्षेत्र माहूर : गणेश राठोड यांची रिपोट.

 

माहूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेले नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांचे कडे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काही काळापुरता मुख्याधिकारी म्हणून पदभार सोपविला होता या काळात त्यांनी शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वच बाबतीत उत्कृष्ट कार्य केल्याने शासनाकडून छत्रपती संभाजी नगर विभागीय स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे विजेते पद व 50 लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर करून डॉ राजकुमार राठोड यांचे फोटो शासकीय वेबसाईटवर टाकून त्याचे अभिनंदन केल्याने माहूर शहरवासी यातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्पर्धा ठेवण्यात आली होती, या स्पर्धेत प्रत्येक नगरपंचायतने सहभाग घेतला होता. माहूरचे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचे सर्व नगरसेवक, नगरसेविका कडून अभियानात नायब तहसीलदार तथा तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड यांनी शासकीय निकषाप्रमाणे प्रत्येक काम लोकसहभागातून तसेच कर्मचाऱ्याकडून उत्कृष्टरित्या करून घेतल्याने माहूर शहरात माझी वसुंधरा अभियान सक्सेसफुल ठरले होते याची दखल शासनाने घेऊन शासकीय निकषाप्रमाणे १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपंचायत साठी ही स्पर्धा होती यामध्ये माहूर नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. राजकुमार गोविंदराव राठोड यांनीअभियान कालावधीत ०१ हजार पेक्षा अधिक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून, त्यांचे व यापूर्वी लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्यात आले आहे.वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी ०३ हजार पेक्षा अधिक देशी वृक्ष असलेली रोपवाटिका तयार करण्यात आली आहे.सणासुदीच्या वेळेस होणारे जल प्रदूषण रोखण्यासाठी गावात कृत्रिम विसर्जन कुंड तयार करण्यात आले असून निर्माण होणाऱ्या निर्माल्य पासून उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत बनविले जात आहे. त्यामुळे नगरपंचायतीस स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ” ओ डी एफ ++” मानांकन प्राप्त झाले आहे असे शासकीय वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे

 

सोबतच अभियानाच्या जन जागृतीसाठी शहरात आय लव यू हे चकाकणारे सेल्फी पॉईंट बसविण्यात आले आहेत.शहरात ठीक ठिकाणी माझी वसुंधरा तत्वे दर्शवणाऱ्या बाबींच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिध्दी करण्यात आली आहे. तसेच सर्व पथदिव्या च्या खांबावर तिरंगा दर्शविणारे लाइट्स बसविण्यात आले आहेत माहूर नगरपंचायतीने माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबाबत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शासनाच्या निकषाप्रमाणे माहूर नगरपंचायतने तंतोतंत कामगिरी बजावल्याने शासनाचा वेबसाईटवर वरील प्रकारे नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांचे फोटो टाकून अभिनंदन करण्यात आले आहे.

या अभियानात नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी ,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड ,कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांचे सर्व अधिकारी कर्मचारी व तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतल्याने नायब तहसीलदार डॉ राजकुमार राठोड यांनी महाराष्ट्र शासनासह सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *