सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधी संघर्ष रेकॉर्ड ब्रेक महाजनआक्रोश सभा.
चातारी प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे.
सर्वत्र चर्चिल्या जात असलेला सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पास उमरखेड हदगाव तालुक्यातील नदी किनारी राहणाऱ्या 45 गावांमधून प्रचंड विरोध होताना दिसून येत आहे.या प्रकल्पाविरोधात आज चातारी येथे भव्य जनआक्रोश महासभेचे आयोजन केले होते.या सभेला अध्यक्ष म्हणुन श्री बापुराव पाटील माने सर , प्रमुख वक्ते प्रल्हाद पाटील जगताप अध्यक्ष निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती, मुबारक तवर प्रसिद्धी प्रमुख व संघटक सचिव, विजय पाटील राऊत सचिव,डॉ. प्रा . प्रदीप राऊत , ॲड . बालाजी येरावार
यांनी प्रकल्पा विरोधात परखड मते व्यक्त केलीत.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीधर पाटील देवसरकर सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधी संघर्ष समिती,प्रास्ताविक राजु आनंदराव माने तर आभार भगवानराव माने यांनी केले.विदर्भ मराठवाड्यातील ४५ गावातील पैनगंगा नदी तिरावरील महिला भागिनी ची लक्षणीय उपस्थिती जेष्ठ, तरुण शेतकरी बांधव हजारोंच्या संखेने उपस्थित होते. तसेच पोलीसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला.चातारी वासीयांनी स्वखर्चातून स्वाभिमानाने महाजनआक्रोश सभेचे नियोजन उकृष्ट पद्धतीने केले होते.
या सभेला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी देखील संघर्ष समितीच्या समर्थनात उपस्थित होते.यावेळी भारत मुक्ती मोर्चा चे विद्वान केवटे यांनी पत्रकार बांधवंशी बोलताना आपली परखड आणि सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली.




