क्राईम डायरी

महागांव : पांदणरस्ता तात्काळ करून द्या!मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिला कुठल्याही क्षणी आत्मदहनाचा इशारा.                            

महागांव : पांदणरस्ता तात्काळ करून द्या!मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिला कुठल्याही क्षणी आत्मदहनाचा इशारा.                            

 

महागांव : लतीफ शेख यांची रिपोट.

 

तालुक्यातील हिवरा (संगम) येथील पांदनरस्ताग्रस्त शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे यांनी मागील अनेक वर्षांपासून त्यांच्या शेत. स.४१/१ क्षेत्र १.४१ आर या आपल्या शेतापर्यंत असलेला पांदण रस्ता मोकळा करून दिलाजावा या मागणीसाठी प्रशासनाचे उंबरवटे झिजवले आहेत. एवढेच नाही तर तब्बल पाच ते सहा वेळा पोषण केले. परंतु आजपर्यंत हाती निराशा आल्याने येत्या 24 मार्च पर्यंत तोडगा न निघाल्यास आपण कुठल्याही क्षणी आत्मदहन करण्याचा निवेदनातून इशारा दिला .मागील वेळी आपल्या सर्जा राजा बैलजोडी व कुटुंबासह महागाव तहसील कार्यालय समोर उपोषण केले. मात्र महागाव तहसील प्रशासनाला रेकॉर्डवरील पांदण रस्ता मोकळा करून देता आला नाही. शेतकरी पांडुरंग आंडगे हे यवतमाळ जिल्हाधिकारी येथील कार्यालयाच्या आवारातील टॉवरवर व हिवरा संगम येथील सोसायटी मैदानावरील टॉवरवर चढले परंतु त्यांना लेखी आश्वासना शिवाय काहीही मिळाले नाही. महागाव तहसील मधील एका वरिष्ठ बाबूने रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी ४० हजाराची लाच मागितली होती. त्या बाबुला शेतकऱ्याने लासलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित माहिती देऊन पकडून दिले, त्यामुळे त्याचा सुद्धा राग माझ्यावर काढत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. दि. २४/०३/२०२५ च्या आधी रस्ता कामात सुरुवात करून रस्ता मोकळा करून द्यावा. अन्यथा तहसील कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी आत्मदहन करायचा इशारा शेतकरी पांडुरंग आंडगे यांनी महागाव तहसील प्रशासनाला दिला आहे.

वैफल्यग्रस्त शेतकऱ्याची व्यथा;

मागील तीन वर्षापासून मी पांदनरस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हा प्रशासन तहसील प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. ५ ते ६ उपोषणे झाली. तत्कालीन आमदारांने,विभागातील अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासनेच दिले. माझा गेल्यावर्षीचा ऊस शेतात तसाच राहिला, वन्य प्राण्यांनी धिंगाणा करून खाऊन टाकला. आता यावर्षीचा नवीन लागवडीचा ऊस, गहू हरभरा शेतात तसाच आहे. तहसील प्रशासनाने तात्काळ रस्ता करून दिला नाही तर मी येत्या दि.२४ मार्चला आत्मदहन करणार आहो, अशी वैफल्यग्रस्त शेतकरी पांडुरंग आंडगे यांनी दिली.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *