महागांव मध्ये महंत शिवराम दासजी त्यागी यांच्या हाती आधुनिक महिला अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन संपन्न.
महाराष्ट्र चीफ एस.के.चांद यांची रिपोर्ट.

महागाव येथे श्री महिला अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन आयोध्या धाम येथील महंत शिवराम दासजी त्यागी यांच्या हस्ते संपन्न झाले.
युवती,महिलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी महागाव येथील श्री कॉम्प्युटर चे संचालक मंगेश वानखेडे यांच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी महिला अभ्यासिका केंद्राची निर्मिती करण्यात आली असुन आज या अभ्यासिकेचे उद्घाटन अयोध्या येथील महंत शिवराम दासजी त्यागी महाराज , रणछोडदासजी त्यागी महाराज,
राघवेंद्रजी त्यागी महाराज,महंत जगदीश महाराज लोणदरेश्वर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन तहसीलदार अभय मस्के,गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, संजय निंबेकर (क्षेत्राधिकारी भारतीय स्टेट बँक शाखा महागाव),विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदिश नरवाडे, सुदाम खंदारे , विजय सुर्यवंशी, संजयकोपरकर ,माजी उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे, प्रतीक नरवाडे ,सुमित धोटे गजू पाटील नरवाडे यांच्यासह अभ्यासिकेचे संचालक मंगेश वानखेडे,अमोल वानखेडे, दादाराव वानखेडे उपस्थित होते.
या प्रसंगी महंत त्यागी महाराज यांनी अभ्यासिकेचे महत्व सांगुन पुरातन काळात गुरुकुलामध्ये राहून एकांतात शिक्षण घेतल्या जात होते.त्यामुळेच इतिहासात अनेक कर्तृत्ववान ऋषी,मुनी,तसेच अनेक महापुरुष लाभले.त्यामुळे या अभ्यासिकेचा लाभ तालुक्यातील गरजुवंत विद्यार्थ्यांनी घेऊन श्री अभ्यासिकेतून कलेक्टर, आयपीएस , डॉक्टर, इंजिनिअर,अधिकारी घडतील असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश नरवाडे यांनी तर सुत्र संचलन डॉ संदीप शिंदे यांनी केले.




