किनवट /रिटा तांड्यात चव्हाण कुटुंबाचा घर आगीत जळून खाक.प्रशांत राठोड यांच्या तर्फे पीडितांना दिली मदत.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी : गणेश राठोड.
किनवट तालुक्यातील मौजे रिटा तांड्यातील पीडित चव्हाण कुटुंबाला प्रशांत राठोड यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने मिळाली भरभरून मदत.
14 मार्च 2025 रोजी किनवट तालुक्यातील मौजे रिटा तांड्यातील यमुनाबाई गोविंद चव्हाण यांच्या घराला एन होळीच्या दिवशी अचानक आग लागली होती. आणि बघता बघता त्या आगीने रोद्र रूप धारण केले होते. सदरील आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु.. चव्हाण कुटुंबियाकडे उपजीविकेचे साधन म्हणून टेन्ट चे सामान होते
आगीमध्ये टेन्ट च्या सामानासह, घरातील धन धान्य, संसार उपयोगी साहित्य, यासह अनेक वस्तू आगीत जळून खाक झाले होते.
ही दुःखद वार्ता, कोसो दूर मुंबई मंत्रालयात बसलेले (कक्षाधिकारी) प्रशांत राठोड यांना कळताच. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता, आपल्या सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना संपूर्ण संसार उपयोगी वस्तू सह धनधान्य घेऊन पीडित कुटुंबाला नेऊन देण्यास आदेशित केले.. आणि लगेच सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक त्या वस्तू घेऊन पिडीतांचं घर गाठलं..
विशेष म्हणजे पिढीताला शासनाची अथवा इतर लोकप्रतिनिधीची कुठलीही मदत मिळण्यापूर्वीच प्रशांत भाऊ राठोड यांच्या सेवा संकल्प प्रतिष्ठान ची मदत मिळण्याचे चित्र मागील कित्येक दिवसापासून किनवट माहूर तालुक्यातील जनतेस पहावयास मिळत आहे..
यामुळे प्रशांत राठोड या नावाचा परत एक वेळेस माहूर किनवट तालुक्यात गावगावा होत आहे.




