ताज्या घडामोडी

ऊस तोडीचे मजूर परतीच्या मार्गावर.दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा गळीत हंगाम लवकरच संपला.

ऊस तोडीचे मजूर परतीच्या मार्गावर.दरवर्षीप्रमाणे यावर्षीचा गळीत हंगाम लवकरच संपला.

 

श्रीशेत्र माहूर प्रतिनिधी = गणेश राठोड.

 

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लवकरच संपल्याने आता ऊसतोड मजूर परतीच्या मार्गावर निघाले आहेत….”झाली तोडणी उसाची धरली वाट घराची” असेच चित्र सध्या पहावयास मिळत आहे. यंदा विधानसभेच्या निवडणुकीमुळे गळीत हंगाम उशिरा सुरू झाले होते. दरम्यान अनेक मजूर राज्यातील कारखाने सुरू होण्याची वाट न पाहता राज्याबाहेर गेले होते. काही कामगारांनी दिवाळी व निवडणुकीत मतदान करून ऑक्टोबर महिन्यात कारखान्याचा रस्ता धरला. मात्र उशिरा सुरू झालेला हंगाम लवकर संपल्याने, अनेक कारखाने बंद झाले आहेत पट्टा पडल्याने अनेक मजूर आपापल्या गावाकडे रवाना होताना दिसत आहे, तालुक्यात बाहेरून व परिसरातून अनेक मजूर छोटे शेतकरी उचल घेऊन ऊस तोडायला जातात. चार महिने हंगाम चालते त्यानंतर हे मजूर गावाकडे येतात. गेल्या वर्षी ऊस लागवड कमी असल्याने यंदा हंगाम लवकर संपले . पुढच्या वर्षी मात्र मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र आहे ऑगस्ट पासूनच कामगारांना उचल देऊन कोयते ठरवले जाते. दसऱ्याला मजूर कारखान्यावर जातात मजुरांचे वर्षभराचे आर्थिक गणित देणे घेणे लग्नकार्य अधिकामे उचलीच्या पैशावर उरकवली जातात. सण उत्सव ही उसाच्या फडातच साजरे केले जातात. ऊसतोड हंगाम मजुरासाठी पर्वणीच असतात. परत त्यानंतर हाताला कामही राहत नाही..

……बाजारपेठात मात्र ओस….

ऊस तोडणीचे मजूर कारखान्यावर गेल्याने तीन ते चार महिने वाड्या वस्त्यावर सुख सुखाट असतो. वृद्ध मुलेबाळे घर राखणीला असतात. दुसरीकडे गावालगतचा परिसर ऊस तोडणी मजुराने गजबजलेला असतो. आता मजूर परतू लागल्याने ग्रामीण भागात बाजारपेठ मोकळ्या वाटू लागले आहेत….

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *