tv9माझा महाराष्ट्र/ ईव्हीएम मशीन मुळे लोकशाही धोक्यात!- वामन मेश्राम. 
प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे
बोल पचासी जय मूलनिवासी ओबीसींची जाती निहाय जनगणना झालीच पाहिजे,
ईव्हीएम मशीन बंद करा. या नाऱ्यांनी काल यवतमाळ शहर दुमदुमले.
“मूलनिवासी बहुजनांना जर संविधान वाचवायचे असेल तर अगोदर ईव्हीएम च्या माध्यमातून धोक्यात आलेला मताधिकार वाचवावा लागेल. देशाचे प्रधानमंत्री हे ओबीसी असून देखील ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यास तयार नाहीत. मुलानिवासी बहुजन महापुरुषांचा आरएसएस बीजेपीच्या माध्यमातून वारंवार होणारा अपमान रोखावयाचा असेल,ओबीसींची जनगणना करण्यासाठी आणि मुलनिवासी बहुजन समाजाला खरोखर आझाद करायचे असेल तर राष्ट्रवादी संघटित शक्ती निर्माण करून चा उपयोग आणि प्रयोग केल्याशिवाय पर्याय नाही”.
असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले.
भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा,राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा द्वारे 9 एप्रिल 2025 रोजी घोषित राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित राष्ट्रव्यापी मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रे अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या सभेत यवतमाळ येथे त्यांनी केले.
यावेळी उद्घाटक म्हणून प्रदीप वादाफळे विदर्भ अध्यक्ष ओबीसी आरक्षण परिषद हे होते.या कार्यक्रमामध्ये विजयराज शेगेकर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय गुरु रविदास कांती मोर्चा मराठा सेवा संघाचे ज्ञानेश्वर गायकवाड,भारत मुक्ती मोर्चाची किशोर नगारे, संभाजी ब्रिगेडचे सुरज खोब्रागडे, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे गणपतराव गव्हाळे, यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपले मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून संविधान चौक येथून सुरू होऊन माऊली मंगलम दारव्हा रोड येथे या कार्यक्रमाची सभेनंतर सांगता करण्यात आली.
यावेळी उपस्थित समाज बांधवांच्या वतीने एक लाख रुपयांचा जनआंदोलन निधी बामसेफ,भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्याद्वारे संघटनेला सुपूर्द करण्यात आला.
यावेळी हजारोंच्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते. भारत मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघ राष्ट्रीय ओबीसी पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद बहुजन मुक्ती पार्टी यांसह विविध सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.




