
पुसद प्रतिनिधी : गोपाल राठोड.
पाणी टंचाई आढावा सभा
महागाव तालुक्यात होत असलेली पाणी टंचाई निवारणार करण्यासाठी तहसील कार्यालयात पंचायत समिती अंतर्गत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानी पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक हे होते. तांड्यावाड्यातील पाणीटंचाई निकाली काढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तहसील कार्यालयात पंचायत समिती अंतर्गत पाणीटंचाईवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यात विंधन विहीर हातपंप कुपनलिका जल जीवन मिशन विहीर पाईपलाईन
पाण्याचे टाके आधीचा आढावा घेण्यात आला नाईक यांनी कांड्या वाड्या व गावात होत असलेली पाणीटंचाई निवारणासाठी युद्ध पातळीवर विहीर बोर अधिग्रहण करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या गेल्या काही दिवसापासून महागाव तालुक्यात अनेक गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असल्याने घरकाम सोडून महिलांना सकाळीच पाण्यासाठी बनवन भटकावे लागत आहे नदी नाले बोर व विहिरी पाणी अभावी कोरड्या पडल्याने मार्च महिन्यातच पाण्याचा फटका नागरिकांना बसला आहे विहिरी अधिग्रहण करून
व काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा
करावयाचा आहे अश्या सूचना
आहे अश्या सूचना आमदार इंद्रनील नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत पाणीटंचाई निवारणासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नसल्याची त्यांनी यावेळी सांगितले या आढावा बैठकीत अनेक गावातील पाणीटंचाईवर चर्चा करून पाणी समस्या सोडविण्या साठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत ही नाईक यांनी व्यक्त केले यावेळी आमदार किसनराव वानखेडे सहायक जिल्हाधिकारी नीलिमा तिवारी तहसीलदार अभय मस्के गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस पाणीपुरवठाचे प्रभारी उपअभियंता सोनी जिल्हा परिषद व पंचायत समिती चे पाणी पुरवठा विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते




