ताज्या घडामोडी राजकारण

माहूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा.नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे माहूर शहरवासीयांना आवाहन.

माहूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा.नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे माहूर शहरवासीयांना आवाहन.

 

माहूर प्रतिनिधी / गणेश राठोड.

 

श्रीक्षेत्र माहूर भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याकडून संयुक्त पणे महाराष्ट्र राज्यात स्वच्छ सर्व्हेक्षण 2025 व माझी वसुंधरा 2025 हे अभियान राबविण्यात येत आहे.नगर पंचायत माहूर ने या अभियानात या वर्षी सुध्दा सहभाग घेतलेला आहे. मागील वर्षी नगर पंचायत माहूर ने मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकावला होता. या अभियाना अंतर्गत मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण 2025 व माझी वसुंधरा 2025 चा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार्या एल ई डी व्हॅन ला नगर पंचायत माहूर च्या प्रांगणातुन दिनांक 06-02-2025 रोजी हीरवी झेंडी दाखवून प्रचार, प्रसार व जनजागृती ची सुरुवात करण्यात आली.यावेळी बोलतांना नगराध्यक्ष फिरोज भाई दोसाणी यांनी जनतेला आवाहन करतांना सांगितले की माहूर शहर तीर्थक्षेत्र असून सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान आहे यासाठी माहूर शहरातील नागरिकांनी माहूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपंचायत ला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले

 

माहूर शहराला नावलौकिक मिळण्यासाठी माहूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कचरा रस्त्यावर न टाकता ओला व सुका कचरा घरीच वेग वेगळा करुन नगर पंचायत च्या कचरा गाडीत टाकावा आणि माहूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर पंचायत माहूर ला सहकार्य करावे.असे आवाहन केले.यावेळी नगरसेविका प्रतिनिधी शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव तसेच राजु सौंदलकर कार्यालय अधिक्षक तथा लेखापाल वैजनाथ स्वामी, अंतर्गत लेखा परीक्षक विशाल मरवाडे, कर निर्धारण अधिकारी स्वाती गुव्हाडे, प्रधान मंत्री योजनेचे अभियंता विशाल ढोरे,स.प्रकल्प अधिकारी देविदास जोंधळे,शहर समन्वयक शेख मजहर, गुंठेवारी विभागाचे विजय शिंदे, स्वच्छता विभागाचे गणेश जाधव,संबधित कंपनीचे संचालक संदीप मते यांच्यासह कर विभागाचे सुरेंद्र पांडे,शेख नयुम, समाधान राठोड, अविनाश बरडे,अजय धामनकर, शिपाई शकीलाबी व ईतर पुरुष सफाई कामगार आणि महीला सफाई कामगार यांच्यासह शहरातील नागरीक उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *