माहूर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे च्या वतीने तुळशी तांडा शाळेमध्ये बसण्यासाठी चार सोफे फंडातून दिले.
माहूर ग्रामीण प्रतिनिधी : संतोष निळकंठवार.

माहूर तालुक्यात तुळशी तांडा येथे दिनांक 27 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये श्री राहुल ढवळे सर यांच्या प्रयत्नामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माहूरच्या वतीने शाळेमध्ये चार सोफे CSR फंडातून उपलब्ध करून देण्यात आले.त्याबद्दल शाळेच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा – माहूर, शाखा व्यवस्थापक आदरणीय श्री कमलेश कुमार साहेब, क्षेत्र अधिकारी शिवम चव्हाण साहेब, सुरक्षा अधिकारी श्री गहूरकर साहेब यांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.आदरणीय महोदयांनी शाळेची पाहणी केली असता शाळेत चालत असलेल्या उपक्रमांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे गुणवत्ते संदर्भात कौतुक केले.




