ताज्या घडामोडी

उमरखेड /ढाणकी नगरपंचायतीमध्ये अग्निशमन वाहन दाखल.

उमरखेड /ढाणकी नगरपंचायतीमध्ये अग्निशमन वाहन दाखल.

 

ढाणकी प्रतिनिधी : नगर पंचायत होण्याआधी ढाणकी गावात आग लागल्यावर उमरखेड किंवा पुसद नगरपालिका मधून अग्निशमन वाहन बोलवावे लागत असे. त्यामुळे 20ते 60 किलोमीटर अंतरावरून अग्निशमन वाहन येईपर्यंत आगीत नुकसान होत होते. हे

पाहता त्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर अग्निसुरक्षा वाहन आवश्यक होते. ढाणकी नगरपंचायत होताच नगरपंचायत प्रशासनाने व नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी माजी आमदार नामदेवराव ससाने यांच्याकडे पाठपुरावा करून याबाबीचे गांर्भीय लक्षात आणून दिले.अग्नीशमन वाहन मिळणेकरीता आमदार नामदेवराव ससाने यांच्या विशेष प्रयत्नातून ढाणकी नगरपंचायतला महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान अंतर्गत नगरपंचायतीला अग्निशमन वाहन खरेदीकरीता रु. 87 लक्ष निधी मंजूर झाला. या प्राप्त अनुदानातून नगरपंचायतमध्ये सदर वाहन दाखल झालेले आहे. ज्यामुळे स्थानिक आग नुकसानीच्या संकटावर मात करणे नगरपंचायत प्रशासनाला आता शक्य होणार आहे. त्यामुळे नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

आज दिनांक 27 जानेवारी ला उमरखेड मतदारसंघाचे आमदार किसनराव वानखेडे यांनी ढाणकी नगरपंचायत येथे अग्निशमन वाहनचे रिबीन कापून लोकार्पण केले.यावेळी मा.नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल, महेश पिंपरवार, रोहित वर्मा, संतोष पुरी, नगरपंचायत मुख्य अधिकारी गणेश चौधरी, दत्त दिगांबर वानखेडे, आनंदराव चंद्रे आणि सर्व नगरपंचायत अधिकारी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *