ढाणकी नगर अध्यक्ष यांनी दिला पाच वर्षाचा लेखा जोखा.पत्रकार परिषद मध्ये दिला आढावा.
ढाणकी प्रतिनिधी :येथील प्रथम लोकनियुक्त नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी आज 23 जानेवारी 2025 ला पाच वर्ष चा आढावा दिला.त्यांनी नगरपंचायत येथे पत्रकार परिषद घेऊन. पाच वर्षात केलेल्या कामा चा लेखा जोखा सांगितला, पत्रकार परिषद मध्ये ते सांगत होते की, त्यांनी ढाणकी नगर पंचायतच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले आहे. कोरोना काळात नगरपंचायत कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन दिला आहे. गावासाठी आठ ट्रान्सफॉर्मर बसून गावातील लोकांना होणाऱ्या वोल्टेज त्रासाचे निवारण लावले. पाणी, रस्ते व आरोग्यासाठी पाठपुरावा केला. महाविकास आघाडी ने जल संधारण नाला योजनेचे बंद केलेले काम पुन्हा जल संधारण नाला योजना चालू करून 8 कि.मी पर्यंत केला. 572 घरकुल मंजूर करून दिले. तसेच गावाला डम्पिंग ग्राउंड नसताना, ढाणकी नगरपंचायत ला 15एकर जागा तसेच पाणी फिल्टर प्लॅन साठी 5एकर जागा उपलब्ध करून दिली. सोलर प्लॅन्ट चालू होण्याच्या मार्गांवर आहे. तसेच मी माझ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात नगर पंचायतला तीन ट्रॅक्टर, तीन घंटा गाडी, एक ऍम्ब्युलन्स, एक अग्निशमन चार चाकी गाडी व अग्निशमन मोटर सायकल असे वाहने उपलब्ध करून दिले .ढाणकी गावाला आपला दवाखाना उपलब्ध करून दिला आणि पोलीस स्टेशन चा प्रस्ताव मंजूर झालेला असून ते लवकरच चालू होईल असे पत्रकार परिषद घेऊन ढाणकीतील सर्व पत्रकार संघटनाला आमंत्रीत करून त्यांनी सांगिले. यावेळी माजी आमदार नामदेव ससाणे, भा. ज. पा जिल्हा समन्वयक नितीन भूतडा, ढाणकी नगर अध्यक्ष सुरेश जयस्वाल, आनंदराव चंद्रे, दत्त दिगांबर वानखेडे, महेश पिंपरवार, बाळासाहेब गंधेवार, संतोष पुरी, साईनाथ मंतेवाड, गोविंद मिटकरे, सर्व नगरपंचायत कर्मचारी आणि गावातील मंडळी उपस्थित होते.