क्राईम डायरी

सरपंच देशमुख हत्याकांडाची नि:पक्ष चौकशी करून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.

सरपंच देशमुख हत्याकांडाची नि:पक्ष चौकशी करून आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.

 

( विदर्भ जनआंदोलन समितीची राज्यपालांकडे मागणी.

 

यवतमाळ विशेष प्रतिनिधी.

 

महागाव:-सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची निःपक्ष चौकशी करून आरोपींना तत्काळ फाशी देवून या आरोपींना पाठबळ देणाऱ्या सत्तेतील मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना मंत्रिमंडळातुन बडतर्फ करावे अशी मागणी विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

बिड जिल्ह्यातील मस्सा जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष यातना देवून त्यांची हत्या करण्यात आली त्या घटनेला आज जवळपास २० दिवस होत आहेत अजुनही मुख्य आरोपी तपासात मिळाला नाही. या आरोपींचे सत्तेत सहभागी असलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी घनिष्ठ संबंध असुन त्यांच्यावर मुंडे यांचा वरदहस्त असल्याने त्याच जोरावर य आरोपींनी पुर्ण बीड जिल्ह्यात दहशत माजवुन खुन, खंडणीसारखे प्रकार केल्याने त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होवून सुध्दा त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. राजकीय पाठबळा त्यांची मोठी दहशत प्रशासनावर असल्यामुळे देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने

 

बिड जिल्ह्यातील मराठा समाज भयभित व दहशतीखाली आहे. त्या भागातील बरेच लोकं आपल्या प्रॉपर्टी विकूण ते इतर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होत आहेत.

 

वरील घटना ही औरंगजेबाच्या कृत्यालाही लाजवेल ऐवढी अमानुषपणे असुन आरोपींनी देशमुख यांच्या एका-एका अवयवाला राक्षसी वृत्तीने डोळ्याला लाईटरने जाळून, वेदना दिल्यात अशा नराधमांना वेळीच बेड्या ठोकल्या नाही तर अफगानीस्तान मधील हिंदु जसा हद्दपार झाला तसा बिड जिल्ह्यातून मराठा समाज हद्दपार होईल. वरील घटना गंभीर असल्यामुळे त्यांची न्यायालयीन चौकशी करुन न्याय देण्यात यावा. तसेच आरोपींना राजकीय पाठबळ देणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यांना सत्तेतून बडतर्फ करावे या प्रकरणाला वाचा फोडणारे आमदार सुरेश धस यांना झेड प्लस दर्जाचे संरक्षणदेण्यात यावे तसेच वरील घटनेस न्याय न मिळाल्यास जनआंदोलन समितीच्या वतीने लवकरच महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येईल. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार महागाव यांच्या मार्फत राज्यपाल यांना देण्यात आले ,यावेळी जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष

जगदिश नरवाडे , ॲड लक्ष्मीकांत भांगे,देवराव हरणे ,अक्षय विरपडे ,सचिन भोपाळे,विकास वांगेकर, सुरेश इंगोले यांच्यासह नागरिक व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या पदाचा दुरुपयोग करून दहशत निर्माण करणाऱ्या धनंजय अकाला सरकार मधून तात्काळ हक्कालपट्टी करून निष्पक्ष चौकशी करून संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

न्याया करिता मराठा समाजाला हातात कायदा घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही

जगदीश नरवाडे

संस्थापक अध्यक्ष

 जन आंदोलन आधार संघर्ष समिती

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *