उमरखेड /गांजेगाव येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता.
उमरखेड प्रतिनिधी :वै.ह.भ प.कामाजी बापु गांजेगावकर यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त गांजेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहची १७ डिसेंबर ला सुरूवात झाली होती या सप्ताहात किर्तनकार ह.भ.प.सुधीर महाराज पळशीकर,ह.भ.प.पांडूरंग महाराज येहळेगांवकर ह.भ.प.पांडुरंग महाराज बेलमंडळ,ह.भ.प.डाॅ.रावते साहेब ढाणकी,ह.भ.प.उमाकांत महाराज नसीं नामदेव, ह.भ.प. हरिभाऊ महाराज दुर्गसावंगी, ह.भ.प.प्रसाद महाराज पंढरपूर यांनी या सप्ताह मध्ये किर्तनरुपी सेवा प्रधान करत, या आधुनिक युगात मानव समाज हा सुख शोधण्यासाठी आजच्या धकाधकीच्या जीवनात जास्त गुंतला असून तो सुख प्राप्ती पासून दुरावून नैराश्य जीवन जगत आहे. आज या धकाधकीच्या जीवनात सुख प्राप्त कसे करावे? या साठी सांगता काल्याच्या कीर्तनातुन प्रबोधन करत दु.खाची निवृती..सुखाचे ते सुख पाहताश्रीमुख गोविंदाचे रंजनी रांगतगुलगुला बोलत……नामा म्हणे…..|
याअभंगातून मानव जीवन जगण्यासाठी उपाय सांगत,चार आश्रामा पैकी गृहस्थाश्रम महत्वाचा संसारात राहून जीवन मंगलमय करता येते. संसारात राहून संस्कृती, संपत्ती, संतती मिळविणे महत्वाचे असते,मी आणी माझे ही वृत्ती सोडविणे महत्वाचे,मनेरी गाय तिला सांभाळणे,विषय रूपी गाईला सांभाळणे असे महत्वाचे अभंगा द्वारे प्रबोधन केले.
या अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचा,तरूणाचा व माता भगिनिंचा उत्स्फूर्त सहभाग होता.