महागांव / फुलसावंगी येथे उमर फारुख रजि.दारुल उलुम मदरश्याची मुहूर्त मेढ रोवण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पूर्व सिने बॉलिवूड अभिनेते आरिफ खान होते.
महागांव प्रतिनिधी =
फुलसावंगी परिसर हा तालुक्यातील मुस्लिम बहुल गाव असून येथील मुस्लिम तरुणांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी पुसद, हिमायत नगर,उमरखेड, वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते.शिक्षणासाठीची मुलांची ही पायपीट थांबावी या उद्देशाने फुलसावंगी येथे उमर फारुख रजि.दारुल उलुम या नावाने मुफ्ती उमर ईशाती, हाफिज शेख मुज्जफर, शेख फारुख यांच्या माध्यमातून मदरश्याची मुहूर्त मेढ रोवण्यात आली आहे. ‘मदरसा’ आणि ‘उलुम’ हें शब्द अरबी असून मदरसा हे शब्द शैक्षणिक संस्थे साठी वापराला जातो तर उलुम या शब्दाचा अर्थ ‘ज्ञान’ असा होतो.फुलसावंगी येथील नव्याने सुरु होत असलेल्या येथील यशवंत नगर मध्ये मदरश्या च्या इमारती च्या बांधकामाची सुरुवात बुधवारी करण्यात आली. या निमित्ताने बुधवारी धार्मिक प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पूर्व सिने अभिनेते आरिफ खान होते. त्यांनी यावेळी त्यांची बॉलिवूड ची सोनेरी जगताला सोडण्याचा प्रसंग विषध करून धार्मिक शिकवणी अंगीकारून त्यावर कडेकोड आचरण करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित हजारो च्या जन समुदयाला केले.