ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत बिटरगांव (बु) सरपंचासह दोन सदस्य अपात्र 

ग्रामपंचायत बिटरगांव (बु) सरपंचासह दोन सदस्य अपात्र

 

ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे

 

उमरखेड तालु‌क्यातील राजकीय दृष्ट्या अतिषय महत्वाची व मोठी समजली जाणाऱ्या बिटरगांव (बु) ग्रामपंचायतच्या सरपंचासह दोन सदस्यांना दि. 25आगस्ट 2025 रोजी यवतमाळ येथील जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा आदेश जारी करून ग्रामपंचायत बिटरगाव (बु) सदस्य या पदावरुण अपात्र घोषीत केले.

 

बिटरगाव (बु) ग्रामपंचायत चे तात्कालीन ग्रामंपचायत सदस्या व सदस्य स्थितीत सरपंच पदि असलेल्या लता प्रताप घोडगे, ग्रां. प. सदस्या देवकाबाई बापूजी तूपेकर व ग्रा. पं. सदस्य तानाजी काशिराम तारशेटवाड या सदस्या विरोधात अपात्रतेचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.सातत्याने मासिक सभेला गैरहजर असल्याने बिटरगाव ग्रामपंचायतचे जेष्ठ सदस्य कोंडबाराव हौसाजी इंगोले यानी एकुन पाच ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध तक्रार केले होते त्यापैकी विनोद नंदकुमार मामीडवार व कालवंदना अनिल गायकवाड यांना संबधीत न्यायालयाने यापूर्वीच अपात्र घोषित केलेले आहे.

 

या आदेशात सदस्य ज्या मासिक बैठकींना अनुपस्थित होते त्या विविध तारखांची माहिती घेऊन बिटरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायत बैठकांना सतत गैरहजर असून तसेच कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता मासिक ग्राम सभा बैठकांसाठी उपस्थिती नसल्याचे रजिस्टरवर सही नसल्याचे आढळून आल्याने सदस्याच्या अनुपस्थितीबाबत चौकशी आणि सुनावणीच्या आधारावर अपात्र केले आहे.

उमरखेड येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालात त्यांच्या अनुपस्थितीची पुष्टी झाल्यावर

अपात्रतेचा निर्णय महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा, १९५८ च्या कलम ४० (1) (ब) नुसार घेण्यात आला आहे.

यवतमाळ येथील जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक मंदार पत्की, आयएएस यांनी अपात्रेचा आदेश जारी केला आहे.

 

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकी अगोदर ही. घटना घडल्याने परिसरातील राजकीय क्षेत्रात एकच खळखळ ऊडालेली आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *