ढाणकी /शाहूराज पाटील देवसरकर यांच्या कडून कोपरा ( बु ) येथील विद्यार्थ्यांना गणवेशचे वाटप.
ढाणकी प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा ( बु ) येथील शाळेला भेट देऊन येथील सर्व विद्यार्थ्यांना युवा उद्योजक शाहूराज पाटील देवसरकर यांच्या कडून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी मयुरी शाहूराज पाटील देवसरकर यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवा मंडळी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हाच खरा आनंद आहे असे मत यावेळी मयुरी पाटील देवसरकर यांनी व्यक्त केले.