ताज्या घडामोडी

उमरखेड युवा ग्रामीण पत्रकार संघाची ढाणकी कार्यकारणी घटित.

उमरखेड युवा ग्रामीण पत्रकार संघाची ढाणकी कार्यकारणी घटि

 

ढाणकी प्रतिनिधी :

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या ढाणकी कार्यकारिणीच्या बैठकीत 29सप्टेंबर रोजी ढाणकी येथील भोसले शोरूम येथे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचलवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्हा उपअध्यक्ष संजय भोसले यांच्या मार्गदर्शनात कार्यकारणी घटित करण्यात आली. अध्यक्ष म्हणून अशोक लक्ष्मण गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपवली.

 

यासोबतच उपाध्यक्ष कैलास किशन घुगरे , सचिव करण भरणे , सहसचिव शेख इरफान शेख गुलाब , कोषाअध्यक्ष मिलिंद चिकाटे ,उपकोषाअध्यक्ष बंटी फुलकोंडवार, संघटक नामदेव गोपेवाड, व प्रसद्धी प्रमुख म्हणून महेबूब शेख आणि अजीज खान, सदस्य म्हणून प्रशांत आरेवाड, रवी जुकुंटवार, रमेश रावते, डॉ. जगदीश रावते आणि विनोद वाढवे यांची जिल्हाध्यक्ष व सदस्य संमतीने नामनिर्देशन करण्यात आली आहे.

 

राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचलवार आणि जिल्हा उपअध्यक्ष संजय भोसले म्हणाले की, पत्रकार मित्रांच्या हितासाठी, विकासासाठी आणि न्यायासाठी त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली राज्यस्तरावरील मोठी जबाबदारी आता कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड होणार नाही लोकप्रतिनिधी आणि सरकारी प्रशासनाकडून लोकांना खोट्या प्रकरणात अडकवणे आदी मुद्द्यांवर पत्रकार मित्रांचा अहिंसक पद्धतीने निषेध करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

 

प्रसद्धी प्रमुख शेख महेबूब यांनी सर्व पदासाठी नामनिर्देशित केल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष व जिल्हा उपअध्यक्ष कार्यकारिणीचे आभार व्यक्त केले.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *