ताज्या घडामोडी

अखेर त्या निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात  (आजाद समाज पार्टी ने दिला होता आंदोलनाचा इशारा )

अखेर त्या निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

(आजाद समाज पार्टी ने दिला होता आंदोलनाचा इशारा )

 

ढाणकी प्रतिनिधी

ढाणकी येथील नगरपंचायत अंतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करून प्रभाग क्रमांक तीन येथे निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला होता, रस्ता तयार झाल्यानंतर काही दिवसातच रस्त्याची गिट्टी उघडी पडली होती सदर रस्ता दुरुस्तीसाठी टाळाटाळ करणाऱ्या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळया यादी टाकून तत्कालीन बांधकाम अभियंत्यावर कारवाई करून रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात आजाद समाज पार्टी तर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा सहा सप्टेंबर रोजी नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आला होता, सदर निवेदनाची नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेत प्रभाग क्रमांक तीन येथील सिमेंट रस्त्याच्या दुरुस्तीस सुरुवात केल्याने आजाद समाज पार्टीच्या मागणीला यश आले आहे,

याबाबत सविस्तर वृत्त असे की ढाणकी येथील प्रभाग क्रमांक तीन येथे माधव आलकटवाड ते नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांच्या घरापर्यंत 227 मीटर सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गतवर्षी 6 जून 2023 रोजी आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉनटी विणकरे यांनी सदर रस्त्याची नव्याने पुन्हा दुरुस्ती करून संबंधितावर कारवाई करा या मागणीसाठी मोबाईल टावर वर चढून शोले स्टाईल आंदोलन केले होते आंदोलनादरम्यान नगरपंचायत प्रशासनाने सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल व दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे व व रस्त्याचे शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांच्यामार्फत लेखा परीक्षण करून त्याचा अहवाल देण्यात येईल आश्वासन दिले होते ,

त्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर संबंधित कंत्राटदाराने पुन्हा रस्ता दुरुस्तीस सुरुवात केली होती परंतु अर्धवट दुरुस्तीचे काम करून सदर ठेकेदाराने पळ काढला होता ,

प्रभाग क्रमांक येथील नागरिक आणि नगरपंचायत प्रशासनाची दिशाभूल करून वेठीस धरणाऱ्या संबंधित कंत्राटदार याला काळया यादीत टाकून कंत्राटदारा कडून दंड वसूल करण्यात यावा तत्कालीन बांधकाम अभियंता यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात जन आंदोलन छेडण्याचा इशारा आजाद समाज पार्टीच्या वतीने देण्यात आला होता आंदोलनाच्या इशाऱ्या नंतर तातडीने सदर प्रभाग क्रमांक तीन येथील निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याच्या दुरुस्ती करण्यास पुन्हा नव्याने सुरुवात झाल्याने ढाणकी येथील नागरिकांकडून रस्त्यासाठी आंदोलन करणाऱ्यारस्ता दुरुस्तीची मागणी रेटून धरणाऱ्या आजाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत असून

आता नगरपंचायत प्रशासन संबंधित निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्यास जबाबदार असणाऱ्या तत्कालीन बांधकाम अभियंता आणि कंत्राटदार यांच्यावर कार्यवाही करणार का? याकडे आता नागरिकांच्या लक्ष लागले असून या रस्त्याप्रमाणे इतर रस्त्याचे पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांनी घ्यावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *