राजकारण

महागांव/श्री नागेश पाटील आष्टीकर यांची तहसील कार्यालयावर पूरग्रस्तांसाठी आढावा बैठक.

महागांव/श्री नागेश पाटील आष्टीकर यांची तहसील कार्यालयावर पूरग्रस्तांसाठी आढावा बैठक.

 

यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर

 

 

 

दि. १९/९/२०२४ गुरुवार ला तहसील कार्यालय महागाव येथे हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थित मध्ये महागाव तहसील कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला महागाव तालुका अंतर्गत उपविभागीय कार्यालय महसूल विभाग कृषी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग पोलीस स्टेशन विभाग नगरपंचायत विभाग, शिक्षण विभाग, पंचायत समिती अंतर्गत कार्यालय विभाग, तालुका ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद स्वरातील पंचायत समिती अंतर्गत वरिष्ठ विभाग अधिकारी विभाग उपस्थिती राहणार आहे, तरी महागाव तालुक्यातील सर्व जनतेस. व शेतकरी वर्गाला विनंती करण्यात येते की ज्या विभागाला आपल्या अडचणी आहेत त्या सोडून घेण्यासाठी महागाव तहसील कार्यालयमध्ये उपस्थित राहावे.व

येतांनी आपण केलेल्या अर्जाची ओसी (०/c) सोबत आणावे.

 

 

उमरखेड व महागाव तालुक्यातील पूरग्रस्त भागातील शेतकरी यांच्या शेती चे व घराचे नुकसान झाले. बऱ्याच ठिकाणी दुधाळ जनावरे वाहून गेली. अनेक ठिकाणी या बाबतीत योग्य पाहणी व पंचनामे झाले नाहीत. अशा स्वरूपाच्या तक्रारी असल्याबाबत शेतकरी व पूरग्रस्तांसाठी श्री नागेश पाटील अष्टीकर यांनी खास या बैठकीचे आयोजन करिता तहसील कार्यालय येथे आढावा बैठक घेण्याचे ठरविले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *