महागांव / निट परीक्षेत गगन भरारी घेणाऱ्या गुलशन सारा मुलीचा ईद- मिलाद उन नबी दिनी सत्कार
(विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी केला पालकांसह विद्यार्थिनीचा सन्मान)
महागाव ता प्रतिनिधी, लतीब शेख
महागाव.निट परीक्षेत घवघवीत यश मिळालेल्या गुलशन सारा पठाण हीचा विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी ईद- मिलाद उन नबी या दीनी शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. महागाव तालुक्यातील सवना येथील अन्वरखान पठाण हे मोलमजुरी करीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आपल्या अशिक्षित पणाची खंत कायम त्यांच्या मनाला सल देत होती त्यामुळे त्यांनी आपली मुले शिकुन मोठी झाली पाहिजेत या ध्येयाने काबाडकष्ट करीत आपल्या मुलांना शिकविले. त्यात त्यांची मुलगी गुलशन सारा हिने आपल्या वडिलांचे स्वप्न पुर्ण करण्याचा निर्धार करीत डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहता जिद्द बाळगुन दिवसरात्र अभ्यास करून निट परीक्षेत ६१२ गुण मिळवीत यश संपादन केले.तिने पुढील शिक्षणासाठी जियु भारतीय वैद्यकीय विज्ञान आणि संशोधन संस्था संलग्नित, जीयु कॉलेज जालना येथे प्रवेश मिळविला आहे.तिच्या यशाबद्दल विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी गुलशन सारा व तिचे पालक अन्वर खान पठाण यांचा सनाच्या दिवशी सत्कार करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी सुधीर नरवाडे,कैलास लोखंडे,सदानंद पुरी डॉ. शिवानी जगदीश नरवाडे हे उपस्थित होते.




