बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी एल्गार पुकारणार
(प्रतिनिधी): गोपाल एच राठोड
वास्तविक पाहता बंजारा समाज हा जंगल घाटी डोंगर इत्यादी ठिकाणी आधीपासून राहत आला असुन स्वातंत्र्यानंतर तांड्या मध्ये वसलेला आहे ज्या प्रकारे बंजारा समाज तांड्या तांड्या मध्ये वसला आहे त्याचं प्रकारे भारत सरकारने या समाजास वेगवेगळ्या सुचिमध्ये समाविष्ट करून देशभरात भटकवले आहे १५ आगस्ट १९४७मध्ये देश स्वतंत्र झाला मात्र बंजारा समाजाला ३१ आगस्ट १९५२ पर्यंत स्वतंत्र मुक्त केले नाही मात्र बंजारा ना गुन्हेगार मानले गेले बंजारा समाजाला बंजारा, लबानी लबाड, लभानी, सुगली, नायक नाईक नायकडा, बाजीगर, मारू बंजारा धाडी बंजारा याउप नामाना एकच बंजारा जातीतील उप नावानी स्वीकारले आहे भारतात राहणाऱ्या बंजारा समाजाची लोकसंख्या ही जवळपास १४ कोटी आहे बंजारा समाज हा सर्व राज्यांत आहे महाराष्ट्र आणि.तामिळनाडू तर बंजारा समाज व्हिजेएनटीत आहे हा भेदभाव का असा प्रश्न चिन्ह निर्माण होतो संपूर्ण भारतात बंजारा समाजाची बोली भाषा वेशभुषा राहन सहण एक असुनही वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात आहे एस टी आरक्षण क्रुती समितीचेने मागील चार वर्षांपासून लढा देत आहे अशी ही माहिती .सामाजिक व माहिती आधीकार कार्यकर्ता गोपाल एच राठोड यांनी.दिली आहे




