ब्योरो रिपोट / एस.के. चांद
“साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे शृंगारिक नसून अंगार निर्माण करणारे साहित्य आहे.त्यांच्या साहित्यातून समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय प्रस्थापित केल्या जाऊ शकतो.”
असे प्रतिपादन भारतीय युवा मोर्चा चे राष्ट्रिय महासचिव व्याख्याते विद्वान केवटे यांनी केले.
उमरखेड तालुक्यातील सिंदगी या गावी आयोजित भव्य प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ढाणकी पोलिस स्टेशन चे ठाणेदार केदार साहेब,लहूजी क्रांती मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष पुंडलिक तलवारे,जिल्हाध्यक्ष शुभम खंदारे, बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे मिलिंद चिकाटे,
राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा चे शेख जब्बार हे उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रिय किसान मोर्चाचे चक्रधर पाटील देवसरकर यांनी,”अण्णाभाऊ साठेंचा विचार आत्मसात करून अठरापगड जातीतील बहुजनांनी एकत्र येऊन व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढली पाहिजे.” असे प्रतिपादन केले.
यावेळी मोठ्या संख्येने गावातील परिसरातील महिला,पुरुष,ज्येष्ठ व बाल बालिका उपस्थित होते.
वैचारिक एकतेचा सामाजिक संदेश देणारा हा कार्यक्रम सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला आहे.
ह्या कार्यक्रमाचे संचलन चांदराव तास्के, यांनी केले तर यशस्वितेसाठी,
हरी वांगे, मंगेश वांगे, किशोर कानडे,विजय वांगे, किशोर कानदे यांसह लहूजी क्रांती मोर्चा च्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.