महागांव स्वराज अग्रो कृषी एजन्सीचा परवाना निलंबित.
महागाव, प्रतिनिधी एस.के शब्बीर
अखेर महागावच्या त्या बोगस रासायनिक खत विक्रेत्यांचा पर्दाफाश झाला. शेतकऱ्यांना बोगसखत विक्री करून फसवणूक करणाऱ्या स्वराज ऍग्रो कृषी एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात आला. येथील दोन रासायनिक खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या गुण नियंत्रण व दक्षता पथकाने 25 जुलै रोजी धाड टाकली होती.
या वर्षी मागील एका महिन्या पुर्वी महागाव तालुक्यात कृषीकेंद्र धारकाकडून मोठ्या प्रमाणात कृषी केंद्रातून बोगस रासायनिक खतांची विक्री करून शेतकऱ्यांची आर्थिक लुट होत असल्याने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि कृषिमंत्र्याकडे शेतकरी नेते तथा जन आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी अनेक शेतकऱ्यांसह बोगस रासायनिक खतांची विक्री करणाऱ्यांच्या सातत्याने तक्रारी करून पाठपुरावा करून शासनाला कार्यवाही करण्यासाठी बाद्ये केले. त्यामुळे कृषी विभागांमध्ये एकच खळबळ उडाली होती. तक्रारीची दखल घेत कृषी विभागामार्फत धाड टाकण्यात आली. महागाव येथील माऊली कृषी केंद्र आणि स्वराज ऍग्रो कृषी एजंन्सी या दोन्ही ठिकाणी कृषी विभागाच्या पथकाने 25 जुलै रोजी धाड टाकून खतांचे नमुने परिक्षणासाठी नेले होते. सदर खतांची तपासणी केल्यानंतर
16 ऑगस्ट 2024 रोजी प्रमोद लहाळे, परवाना प्राधिकारी तथा जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यवतमाळ यांचे समक्ष कल्याण पाटील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रस्तावित केलेला मे.स्वराज ऍग्रो च्या संचालीका सौ. प्रिया अमोल तगलपल्लेवार यांचा परवाना क्र. एलसीएफाआरडीओ 3202203602 झालेल्या सुनावणी दरम्यान निलंबित करण्यात आला. निलंबित झाल्याच्या दिनांकापासून सदर ऍग्रो एजन्सी बंद ठेवण्याची सक्त आदेश देण्यात आले. या कार्यवाहीमुळे महागाव तालुक्यातील बोगस रासायनिक खते विक्रेत्यांची धाबे दणाणलेत.
1)नोंदणी प्रमाणपत्रात कृषी केंद्रात विक्रीस ठेवलेल्या सर्व कंपन्यांच्या खतांचा उगम प्रमाणपत्राचा समावेश करून घेतलेला नव्हता. करिता त्यांनी खत नियंत्रण आदेश 1985 चे खंड 8 चे उलन केले.
2) रासायनिक खत साठवणुकीचे स्थळ (गोडाऊन) हे परवान्यामध्ये समाविष्ट केलेले नव्हते. त्यामुळे खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.
3) पोटॅश मोबीलाझींग बायोफर्टीलायझर हे खत शेतकऱ्यांना बिला मध्ये पोटॅश खत नमूद करून विक्री केली.
परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी 21 ऑगस्ट 2024 रोजी परवाना निलंबनाची कार्यवाही केली. महागाव कृषी विभागाच्या दुर्लक्षित भूमिकेमुळे तालुक्यांत इतरही ठिकाणी अशा बोगस रासायनिक खते विक्रेत्यांकडून बोगस रासायनिक खतांची सर्रास विक्री चालू असल्याचे बोलल्या जाते, अशा विक्रेत्यांवर कार्यवाहीची टांगती तलवार आहे.
या कार्यवाही सोबतच बोगस रासायनिक खत साठवणूक ज्यांच्या गोदामात आहे, त्या गोडाऊन मालकावरही कार्यवाही होणे अपेक्षित आहे.